ISO प्रमाणपत्र पंचायत समिती कार्यालयाला  त्याच्या सेवेच्या गुवात्तेसाठी प्रदान केले आहे. पंचायत समिती कारंजा या कार्यालयाने  नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा बद्दल नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.

आंतरराष्ट्रीय मानांकीकरण संस्था (ISO) प्रमाणपत्र

ISO म्हणजे आंतरराष्ट्रीय मानांकीकरण संस्था (International Organazation For Standardazation) द्वारे दिले जाणारे गुणवत्ता व्यवस्थापन आणि इतर विविध मानकांसाठी एक प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र असे दर्शविते कि, एकादे कार्यालय, कंपनी किवा संस्था यांनी ठरविलेल्या मानदंडाची पूर्तता करते.
हे प्रमाणपत्र कामाची गुणवत्ता आणि कार्यप्रणाली आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित करते.

सदर प्रमाणपत्र मा. श्री. परागजी  सोमण (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. वर्धा), मा, श्री. सुरजजी गोहाड (अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. वर्धा), मा. श्री. अमोलजी भोसले (उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं./सामान्य जि.पं. वर्धा), मा, श्रीमती वैशाली रसाळ (प्रकल्प संचालक, वर्धा), मा. श्री. Dr. बुतकरे (जिल्हा उप आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग, वर्धा), मा. श्री, प्रफुल लोखंडे (उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पा.पु.व.स्व.वि. वर्धा) यांच्या हस्ते व उपस्थितीत दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ ला मा, श्री, प्रविण देशमुख (गट विकास अधिकारी.पं. स. यांनी त्यांच्या सहकार्यासोबत  स्विकारण्यात आले. यावेळी श्री. अशोक पवार (कक्ष अधिकारी), श्री. कैलाश वानखेडे, विस्तार अधिकारी (ग्रा,पं.), श्री अमोल धोटे, विस्तार अधिकारी (ग्रा.पं.), श्री. महेश घोडे, विस्तार अधिकारी (कृषी), श्रीमती वानखेडे, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आणि पंचायत समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

पंचायत समिती कारंजा विषयी

कारंजा हे हे जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंचायत समितीपैकी एक असून, वर्धा जिल्ह्याच्या अगदी टोकाकडे नागपूर – अमरावती या राष्ट्रीय महामार्गावर आहे. वर्धा जिल्ह्यापासून यांचे अंतर ७२ कि.मी. दूर आहे. पंचायत समिती अंतर्गत ५९ ग्राम पंचायती आहे. पंचायत समितीची सन २०११ च्या जन गणणेनुसार लोकसंख्या हि ९०४६२ आहे. जिल्हा परिषदेच्या एकून शाळा ९४ असून अंगणवाडी केंद्रे १२६ व मिनी अंगणवाडी केंद्रे ८ आहे. पंचायत समिती अंतर्गत १ ग्रामीण रुग्णालय असून प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या हि ३ आहे. पशुवैद्कीय दवाखान्याची संख्या १३ (जिल्हापरिषद ६ आणि राज्य शासन ७) आहे. पंचायत समिती कारंजा अंतर्गत १२१३ बचत गट कार्यरत आहे. आणि उमेद अंतर्गत चांगले व्यवसाय करीत आहे. गावाच्या विकासासाठी पंचायत समिती सदैव्य कार्यरत असते.

पंचायत समिती कारंजा नकाशा

कारंजा पंचायत समितीचे भौगोलिक क्षेत्र ६०६१८.६५ हेक्ट. आर. आहे. लागवडी खालील क्षेत्र ४२१२८ हेक्ट. आर. महसूल खालील क्षेत्र १७५७.०८ हेक्ट. आर. , वन खालील क्षेत्र ८१७०.०८ हेक्ट. आर. डोंगराळ क्षेत्र २४.०८ हेक्ट. आर. आणि सपाट क्षेत्र ३.९७ हेक्ट. आर. एवढे आहे. कारंजा पंचायत समिती कार्यक्षेत्राचा बराच भाग हा वन परिक्षेत्र खाली येतो. बोर व्याघ्र प्रकल्प हा एक भाग कारंजा पंचायत समिती अंतर्गत येतो.
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, यांच्यावर नियंत्रण ठेवणारे एक जिल्हा परिषदेचा एक घटक आहे.

Scroll to Top